पुणे- कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ,नगरसेवक अविनाश बागवे आणि माय मराठी ने केलेल्या धडक कारवाईत ‘त्या’ बोगस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून तर देण्यात आले. त्याच्यावर आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हाही दाखल झाला . पण त्याला तिथे बसविणारे कोण होते ? कोण कोण या कटात सामील होते ? या सर्वांचा बुरखा खेचण्याची गरज निर्माण झाली आहे. एकटा ‘तो ‘ कर्मचारी दोषी होता काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यामगे नाही असेच उत्तर येईल . त्याला कोणी कोणी सामील करून घेतले होते ? नेमके हि मंडळी कशासाठी अशा बोगस कर्मचाऱ्यांची मदत घेत होती ? या सर्व प्रश्नांची उकल आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवेदनातून होणार काय ? असा प्रश्न आता पुढे आहे .
दरम्यान गेल्या महिन्यातील १९ जुलै रोजी झालेल्या या प्रकरणाचे नेमके पुढे झाले काय ? महापालिकेच्या आणि पोलिसांच्या तपासात नेमके काय निष्पन्न झाले ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत . याची उत्तरे अर्थातच येत्या काही दिवसातच मिळण्याची अपेक्षा आहे.