पुणे-…..इन काली सदियों के सर से, जब रात का आँचल ढलकेगा, जब दुःख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा ,जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नग्में गायेगी, वो सुबह कभी तो आयेगी…हे मुकेशजींचे गाणे ऐकले असेल बहुतेकांनी ,किंवा मोहम्मद रफींचे सुबह न आई , शाम न आई ..हे गाणे ऐकले असेल ..या गाण्यात जशी आर्तता आहे …तशीच ..पण वेगळ्या कारणाने … ‘ती ‘संध्याकाळ कधी येतच नाही … अशा वाक्याने एका तरुण आणि नवोदित नगरसेवकाने आपली व्यथा आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत व्यक्त केली . अर्थात ते कारण ..म्हणजे .. आपल्या वार्डात जेव्हा जेव्हा नळाला पाणी येत नाही ,तेव्हा तेव्हा मी अधिकाऱ्यांना विचारतो ,आणि ते सांगतात संध्याकाळी येईल पाणी ..नागरिकांना मी सांगून सांगून वैतागलो ,संध्याकाळी पाणी येईल , पण ती संध्याकाळ कधी आलेली नाही … अशा शब्दात आपली व्यथा आज नगरसेवक आदित्य माळवे यांनी मांडली .
त्याला कारण हि तसेच झाले, गेल्या काही दिवसांपासून यंदा ऑक्टोबर महिन्यातच पाणी कपातीचा विषय गाजतो आहे . कालवा फुटल्यानंतर कपातीचा हा विषय सुरु झाला . शिवाजीनगरच्या पोलीस लाईन मध्ये पाणी न आल्याने तेथील नागरिकांनी पालकमंत्र्यांना घेरावो घातला . या सर्व पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांनी मुख्य सभेत पाणी कपातीच्या तथाकथित प्रयत्नांच्या विरोधात मुख्य सभेत निदर्शने केली आणि त्यावर बोलण्याची संधी महापौरांकडून मिळवून घेतली . विरोधक तर बोललेच . पण भाजप नगरसेवक देखील मागे राहिले नाहीत .त्यांनीही आपापल्या पाण्याच्या समस्येबद्दल च्या व्यथा मांडल्या . यावेळी भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी मोठ्या मार्मिक पणे आपल्या व्यथा मांडल्या ..पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात …