पुणे- बीडीपी मधील एका बांधकामाच्या पाडापाडी वरून माजी उपमहापौर आणि सध्याचे भाजप नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी काल झालेल्या पालिकेतील भाजपच्या बैठकीत स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे .
महापालिकेत भाजपा या पक्षाला स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे .या ठिकाणी भाजप नगरसेवकांच्या बैठका होत असतात . आज होणाऱ्या मुख्य सभेच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भाजप नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या वेळी प्रसन्न जगताप यांनी थेट हि तक्रार करत नाराजी व्यक्त केली . महापौर ,सभागृहनेते ,आणि भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते . या बैठकीत आपल्याला आपल्या व्यथा मांडायच्या होत्या पण त्या मांडू दिल्या जात नाहीत ,सभागृहात बोलायचे असते पण बोलू दिले जात नाही . अशा तक्रारी आज सकाळी भाजपच्या काही नगरसेवकांनी नावे न सांगण्याच्या अटीवर माध्यमांकडे केल्या .