गंगाधर बधेंच्या १० एकरावर आरक्षणे …
पुणे- एकीकडे निवडणुकांच्या तोंडावर जातीय आरक्षणांच्या विषयाने राज्यात गदारोळ माजला असताना दुसरीकडे जमिनीवरच्या आरक्षणांचा कुटील कारभार महापलिकेच्या पातळीवरून मोठ्या रंजक पद्धतीने खेळला गेल्याचे चित्र पुढे येते आहे .
येवलेवाडी विकास आराखडा करताना २ ते ३ ठिकाणी असलेल्या गंगाधर बढे यांच्या सुमारे १० एकर जागेवर कचरा डेपो ,दफनभूमी ,आणि इडब्ल्यूएस चे आरक्षण टाकल्याचे वृत्त हाती आले आहे .
हे आरक्षण राजकीय वैमनस्यातून टाकले आहे कि आणखी कसे यावर आता विचारमंथन होत आहे . बधे शिवसेनेचे असून त्यांनी महापालिका निवडणूक लढविली होती .आता ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते .