पुणे- महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून कामे करवून घ्यायची असतील तर त्यांच्याशी गोड गोड बोलून कामे करवून घ्या असे अनुबावी नगरसेवक सांगतात , बायकोशी गोड बोलत नाही एवढा अधिकाऱ्यांशी मी गोड बोलतो .तरीही कामे होत नाहीत ..आता काय ..अधिकाऱ्यांना लव्ह लेटर पाठवू काय ? असा सवाल आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला ..
कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि भाजपच्या सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि नगरसेवकांनी आजच्या मुख्य सभेत निर्ढावलेल्या ,कामांसाठी टंगळ मंगळ करणाऱ्या ,नगरसेवकांनाही बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले याकामी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक वगळता कॉंग्रेस भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी ;अशा ‘ अधिकाऱ्यांना लक्ष करून आयुक्त सौरव राव यांच्यापुढे जाहीरपणे आपली व्यथा आणि संताप व्यक्त केला …
यावेळी पहा आणि ऐका नगरसेवक अमोल बालवडकर काय म्हणाले …