पुणे- प्रायोगिक तत्वावर पीएमपीएमएल चे फायद्यातील काही मार्ग फोर्स कंपनीला देण्याचा प्रकार म्हणजे पीएमपीएमएल चे नुसते खाजगीकरण नसून तो विकण्याचाच डाव आहे .आणि याचे सूत्रधार भाजपचे शहराध्यक्ष आहेत असा घणाघाती आरोप येथे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे . या प्रकाराविरुद्ध १४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता पीएमपीएमएल च्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे हि त्यांनी सांगितले . पहा आणि ऐका नेमके तुपे पाटलांनी काय म्हटले आहे ,त्यांच्याच शब्दात ….