पुणे- गेल्या सभेत तावातावाने विषय महिनाभर पुढे ढकलला जातो, पण तोच विषय महिन्यानंतर पुन्हा सभेत येतो तेव्हा शांतपणे चिडीचूपपणे अवघ्या काही सेकंदात पास होतो अशा अनेक गोष्टी पालिकेच्या मुख्य सभेत घडतात . हे सोडा .. पण जेव्हा आरोग्य सेवेवर विविध आरोप होत असतात आणि जेव्हा आरोग्य प्रमुखांकडून रिक्त जागांची माहिती घेतली जाते तेव्हा मात्र हा विषय कसा टोलविला जातो ते कालच्या मुख्य सभेत दिसले . एवढेच नव्हे तर गेल्या १९ एप्रिल च्या मुख्य सभेत असिफा आणि महिला अत्याचारावर केंद्र आणि राज्य सरकारला पुण्याच्या वतीने पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला , एवढ्या संवेदनशील विषयावर 4 दिवसात तरी पत्र पाठविले कि नाही ? असा प्रश्न जेव्हा २३ एप्रिल ला उपस्थित झाला , तेव्हा ..म्हणजे महिला अत्याचारावर , महिला नगरसेविकेच्या प्रश्नावर , महिला महापौरांचे मिळालेले उत्तर पहा …
महापालिकेच्या मुख्य सभेत कसे गुंडाळले जातात विषय (व्हिडीओ)
Date:

