पुणे- देशभर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना पुणे महापालिकेच्या शाळेतील मुलींची सुरक्षितता सुद्धा धोक्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे . मार्केटयार्ड परिसरातील एका शाळेत सहावीच्या एका मुलीवर शाळेतच अत्याचार झाला आणि ती 4 महिन्याची गर्भवती असताना हा अत्याचार उघड झाला .. याबाबत वृत्तपत्रातून आलेली बातमी आणि मुख्यसभेत विपक्षनेते चेतन तुपे यांनी उठविलेला आवाज ही , यावर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून उत्तरे मिळवू शकला नाही . शाळेत मुलगी गेल्यानंतर तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी अधिकारी आणि मुख्याध्यापक किंवा अन्य अधिकारी यांच्यावर आहे किंवा नाही ? अशा प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत . आज महापालिकेची मुख्य सभा पुन्हा होते आहे …हा संवेदनशील मुद्दा पुन्हा उठवून याबाबत जाब कोणी विचारणार ? कि हा मुद्दाच सोडून देणार ? हे आज स्पष्ट होईल .
पालिका शाळेतील मुलीवर अत्याचार -कारवाई नाही कोणावर ?(व्हिडीओ)
Date:

