पुणे- महापालिकेच्या शिववसृष्टीवरील खास सभेत विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी कोथरूड मध्ये शिवसृष्टी आणि मेट्रो दोन्ही होतील. यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी .. मात्र आधी शिवसृष्टी नंतरच मेट्रो अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली . कोथरूड यथे शिवसृष्टी आणि मेट्रो दोन्ही होऊ शकतात . असे ते म्हणाले . कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे 28 एकर पाच गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच याच जागेवर मेट्रोचे टर्मिनस ही प्रस्तावित आहे.
कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरावा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाबाबत आज (28 जुलै) खास सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानुसार महापालिका भवन परिसरात शिवसृष्टी बनवण्याचे फ्लेक्स व झेंडे लावण्यात आले आहेत. सभागृहाच्या बाहेर रांगोळी व शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. यावेळी सभेपूर्वी सर्व विरोधकांनी तीव्र आंदोलन करीत शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मेट्रोची निंतात गरज आहे. त्यामुळे मेट्रोचे भुयारी स्थनाक करून तिथे शिवसृष्टी उभारावी अशी मागणी होत आहे .