पुणे- महिला आणि समाज सुरक्षा हि नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवकांची ही आहे अशी जाणीव करून देत खालावत चाललेली संस्कृती आणखी किती असिफांचे बळी घेणार ? असा सवाल आज माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी महापालिकेच्या सभागृहातून जम्मू -कथुवा च्या असिफाला न्याय मागताना केला .
‘भारत का रहनेवाला हु , भारत कि बात सुनाता हु … या गाण्यांच्या ओळीने आपल्या भाषणाला सुरुवात करत मानकर म्हणाले , कुठे हरवली ती संस्कृती आणि कुठे गेली ती चांगली माणसे .. कोरेगाव पार्क च्या पब च्या रात्री पाहिल्या तर तेथील मुले मुली काय अवस्थेत असतात ?हे पब बंद करण्यासाठी नगरसेवकांनी पुढे यायला नको का ?इथे गेलो तर आपण पुण्यात आहोत कि आणखी कुठे असा प्रश्न पडतो ,
असिफा वरील अत्याचाराने देशाचा ऊर दाटून आला आहे .इथून पुढे तरी असिफाचा बळी जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी . टवाळखोरांवर धाक ठेवून प्रसंगी त्यांना सरळ करण्याचे काम केले पाहिजे . देशातील महिला आणि समाज सुरक्षेची जबाबदारी असणार्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे …. पहा आणि एका नेमके मानकर यावेळी काय म्हणाले …