पुणे- सहकारनगर नंबर २ मधील महापालिकेच्या मालकीची ८१.३० चौरस मीटर एवढ्या बांधकाम क्षेत्राची मिळकत श्री योगी अरविंद सांकृतिक मंच या संस्थेला ५ वर्षासाठी विनामोबदला देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मुख्यसभेत कॉंग्रस गटनेते अरविंद शिंदे आणि विपक्ष नेते चेतन तुपे पा. यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे महिनाभर पुढे ढकलण्यात आला .
प्रभाग क्रमांक ३५ मधील सर्वे नंबर ८५/८६ सि.स. नं. १७८२ सहकारनगर नंबर २,पर्वती येथील महापालिकेची मिळकत या समाजिक संस्थेला १३ जुलै २०१७ ते १२ जुलै २०२२ या ५ वर्षासाठी देखभाल व व्यवस्थापनासाठी मिळकत वाटप नियमावली २००८ च्या तरतुदीस आधीन राहून विनामोबदला देण्यास मान्यता द्यावी असा प्रस्ताव धनकवडी-सहकारनगर समिती तून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता . यावेळी हे कायदेशीर आहे काय ?हि नियमावली आहे त्यातील तरतुदी वाचून दाखवा , अशाप्रकारे आपल्याला पालिकेची मिळकत मोफत देता येत नाही. हि एकच सामाजिक संस्था चांगले काम करते आहे काय ? असे मुद्दे अरविंद शिंदे आणि चेतन तुपे पाटील यांनी उपस्थित केले .
यावेळी सुनील केसरी यांनी आपण आता नियमावली बरोबर आणलेली नाही असे सांगितल्याने ,संपूर्ण माहिती घेवून कागदपत्रे घेवून या असे या दोघांनी सांगितले . त्यानंतर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा केली , आणि हा विषय एप्रिल महिन्याच्या कार्यपत्रिकेवर घ्यावा अशी उपसूचना दिली. त्यास कोणी विरोध केला नाही . त्यामुळे हा प्रस्ताव आता एप्रिल महिन्याच्या मुख्य सभेपुढे पुन्हा चर्चेसाठी येणार आहे .
सहकारनगर मधील पालिकेची मिळकत मोफत देण्याचा प्रस्ताव महिनाभर पुढे ढकलला
Date:

