पुणे-सार्वजनिक जागा, रस्त्यांवर बंद स्थितीत असलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई
पुणे मनपा हद्दीतील सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथावर बऱ्याच ठिकाणी दुचाकी, तीन चाकी,
चारचाकी वाहने बंद अवस्थेत अनेक दिवसांपासून पडून आहेत. अशा पडून असलेल्या वाहनांचा
समाजकंटकांकडून / दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपातासाठी वापर केला जाण्याची शक्यता पोलीस
विभागाकडून यापूर्वी वर्तविण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच भारत सरकारच्या
स्वच्छ भारत अभियानांतर्गत अशी अनेक दिवसांपासून बेवारस / बंद अवस्थेत पडलेली वाहने
महानगरपालिकेकडून पोलीस वाहतूक विभाग यांचे मदतीने उचलण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या अनुषगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांस जाहीर आवाहन करण्यात येते कि,
ज्या नागरिकांच्या मालकीच्या बंद गाड्या सार्वजनिक जागांवर, सार्वजनिक रस्त्यांवर / पदपथावर अनेक
दिवसांपासून बंद / मोडक्या अवस्थेत पडून आहेत, त्या गाड्या संबंधितानी तीन दिवसाच्या आत स्व:ताचे
खर्चाने हलविण्यात याव्यात. या मुदतीनंतर अशी बंद / भंगार वाहने पोलीस वाहतूक विभाग व पुणे
महानगरपालिका यांचे संयुक्त कारवाई मोहिमेअंतर्गत उचलून नेण्यात येतील. बंद वाहने शासकीय
यंत्राणेमार्फत हटविताना वाहनांचे नुकसान / मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस विभागाची
अथवा महानगरपालिकेची राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. असे पत्रक महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे .