पुणे- मानला तर देव,नाही तर दगड म्हणतात.. तसेच काही तरी , मानली तर गोष्ट गमतीची किंवा गंभीरतेची … पण झलक पहायलाच हवी म्हणून .. महापालिका मुख्य सभेतील हा प्रसंग जरूर पहा आणि निट ऐका ..
पालिकेची मुख्य सभा सुरु झाली कि आयुक्तांनी किंवा डायस वरून कोणीही वरिष्ठ अधिकारी महापौर यांनी कुठे जायचे झाल्यास परवानगीने जाणे आवश्यक असते . महापौर अशा सभागृहाच्या परवानगीने किंवा सांगून जावू शकतात तर आयुक्त ,नगरसचिव महापौरांच्या परवानगीने जाऊ शकतात … पण नेमके काही मुद्दे उपस्थित होतात आणि काहीजण गायब होतात अशा तक्रारी पूर्वी नगरसेवकांच्या बाबत जशा बोलल्या जात तशा आता आयुक्तांबद्दल ऐकायला आल्यास नवल वाटणार नाही ,आबा बागुल आणि अविनाश बागवे यांचे महत्वाचे प्रश्न आज उपस्थित होणार असताना त्यावर आयुक्तांनी उत्तरे देणे आवश्यक असताना … आयुक्त सभागृहातून गेल्याने मोठे आश्चर्य वाटू लागले आहे . पहा एक अशीच गमतीदार झलक …