Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अखेर भाजपचा जिझिया कर.. पुणेकरांच्या माथ्यावर.. (व्हिडीओ )

Date:

पुणे-आयुक्त कुणालकुमार यांनी प्रतिष्ठेचा केलेला पार्किंग धोरणाचा प्रस्ताव आज अचानक स्थायी समितीत आणून तो मान्य करवून घेवून तातडीने मुख्य सभेत कोणाचाही विरोध न होता दाखल करण्यात आला .या प्रस्तावाद्वारे प्रत्येक पुणेकराला आपण वापरत असलेल्या वाहनाद्वारे हजारोचा कर महापालिकेच्या झोळीत टाकावा लागणार आहे . खाजगी  वाहने वापरू नयेत म्हणून पुणेकरांची या कराद्वारे गळचेपी ..करून जबरदस्ती करणारा हा प्रस्ताव आहे . त्यामुळे या कराला औरंगजेबाच्या जिझिया कराचा बाप म्हणण्याची वेळ पुणेकरांवर येईल असे मानले जाते . भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांचा आणि भाजपमधील अनेक नगरसेवकांचा विरोध असताना सुद्धा हा कर पुणेकरांच्या माथ्यावर लादण्याचा प्रयत्न होतो आहे .येत्या २३ तारखेला हा प्रस्ताव आता मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी चर्चेला येईल .

शहरातील, उपनगरातील कोणत्याही  रस्त्यावर  तुम्हाला गाडी पार्क करायची असल्यास दुचाकीसाठी तासाला 2ते 4  रुपये तर चारचाकी  10 ते 20 रुपये शुल्क मोजावे लागतील असा प्रस्ताव  स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला . राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या 4 सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले तर भाजपच्या १० सदस्यांनी पक्षाचा आदेश म्हणून यास सहमती दिली .

पुणे शहरामध्ये प्रशासन कडून  सायकल योजने नंतर आता संपूर्ण शहरामध्ये नवीन सार्वजनिक पार्किंग धोरण तयार करण्यात आले आहे. यासाठी एका कंपनीकडून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतुक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपुर्ण शहरभर पे अ‍ॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे.

रहदारीनुसार वर्गवारी आणि पार्किंगचे दर –
शहरात रस्त्यांवरील रहदारी आणि गर्दी विचारात घेऊन तीन झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. ‘अ’ झोनमध्ये कमी वर्दळ, ‘ब’ झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि ‘क’ झोनमध्ये अतितीव्र वर्दळ अशी वर्गवारी करण्यात येणार आहे.

त्या वर्गवारीनुसार अनुक्रमे दुचाकींना दोन रुपये, तीन आणि चार रुपये, रिक्षाचालकांना सहा रुपये, नऊ आणि 12 रुपये तसेच चारचाकी वाहनांना दहा, 15 आणि 20 रुपये दर आकारण्यात येणार आहे. 

  • प्रशासनाच्या प्रस्तावित दरापेक्षा 80 टक्‍के कपात केल्याचा स्थायीचा दावा 
  • पार्किंग झोनसाठी शहरातील 1800 किलोमीटरचा सर्वे करणार 
  • पोलिस आणि महापालिकेच्या पथकाकडून संयुक्‍त पाहणी 
  • पोलिसांच्या अधिसूचनेनंतर पार्किंग झोन निश्‍चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी 
  • रात्री दहा ते आठपर्यंत पार्किंगची रक्‍कम महापालिका वसूल करणार 
  • दिल्ली, मुंबई आणि नागपूर येथील पार्किंगच्या तुलनेत दर कमी असल्याचा दावा 
  • स्थायी समितीमध्ये दहा विरुद्ध चार मताने प्रस्ताव मंजूर 

असे असतील पार्किंगचे दर – 
पार्किंगचे दर अ, ब आणि क वर्गवारीनुसार (प्रति तासाला) 

वाहन प्रकार अ वर्ग ब वर्ग क वर्ग
दुचाकी दोन रुपये तीन रुपये चार रुपये
तीनचाकी आणि रिक्षा सहा रुपये नऊ रूपये 12 रुपये
मोटार 10 रुपये 15 रुपये 20 रुपये
मालवाहू टेम्पो सहा रुपये नऊ रुपये 12 रुपये
मिनी बस 15 रुपये 12 रुपये 30 रुपये
अवजड वाहने आणि ट्रक 20 रुपये 30 रुपये 40 रुपये
खासगी प्रवासी बस 30 रुपये 45 रुपये 60 रुपये

 

निवासी -रात्री पार्किंग शुल्क (रात्री १० ते सकाळी ८ )

एका रात्रीला १० रुपये –वार्षिक ३६५० रुपये

जुने वाडे ,जुनी वसाहती,,समाविष्ट गावातील इमारती,

रात्रीला 5 रुपये याप्रमाणे वार्षिक १८२५ रुपये

झोपडपट्टी रात्रीला  अडीच रुपये याप्रमाणे वार्षिक ९१० रुपये

 

याबाबतचा मूळ प्रस्ताव आयुक्तांचा होता त्यातील शुल्कात  ८० टक्के कपात करणारी उपसूचना देण्यात आली  त्यात शुल्क कमी केलेली आहे  हि उपसूचना मंजूर करण्यात आली . . विशेष म्हणजे या उपसूचनेवर नगरसेविका नीलिमा खाडे आणि कविता वैरागे यांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या घेण्यात आलेल्या आहेत .

सविस्तर उपसूचनेसह प्रस्ताव पुढे फोटो स्वरूपात जसाच्या तसा ..पहा

 

आणि संदर्भातील स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात झालेल्या  पत्रकार परिषदेतच सत्ताधाऱ्यांचे वाभाडे निघाले  ..हि पत्रकारपरिषद पहा आणि ऐका जशीच्या तशी …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...