पुणे- कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांशी लढत करायची तेव्हा करतील ..पण भाजपच्या नवीन नगरसेवकांवर ,किंवा सरळमार्गी चालू पाहणाऱ्या नगरसेवकांवर सध्या तरी खरा सामना प्रशासनाबरोबरच करण्यात जास्त वेळ घालवावा लागतो आहे . याची अनेक उदाहरणे महापालिकेत देता येतील . त्यातील एक येथे देत आहोत , बालेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे …
भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडी गाव मुख्य चौकात जिल्हा परिषदने सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत होती व या ठिकाणी बाजूला नवीन टाकीचे बांधकाम झाल्याने हि टाकी वापरात हि नव्हती. या टाकीखाली गावातील अनेक वृद्ध व्यक्ती व महिला बसत आल्याने या टाकी पडण्याचा धोका अधिक वाटतो म्हणून .
हि टाकी पाडण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व भवन विभागाला ३.दि.५ मे २०१७ रोजी आणि दि.१७ मे २०१७ रोजी पत्राद्वारे कळविले.पत्र दिल्यानंतर ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून देखील संबंधित विभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नगसेवक अमोल बालवडकर यांनी म.न.पा.मुख्य सभेत याबाबत आवाज उठविला आणि १ महिन्यांच्या आत हि टाकी पडण्याचे आश्वासन मिळविले , पण पुढे पुन्हा सुरु झाला .. हे आश्वासन पाळा म्हणून पुन्हा पाठपुराव्याचा प्रवास ..अखेर १ महिन्यानंतर पाणी पुरवठा विभागाकडून हि टाकी पाडण्यात आली. परंतु पाडलेल्या टाकीचा राडारोडा न उचलता जागेवरच सोडण्यात आला.आता तो उचलावा म्हणून अमोल बालवडकर गेली १ महिना पाठपुरावा करत आहेत …
आणि यातच त्यांची आमची भेट झाली ..
आणि यातच त्यांची आमची भेट झाली ..
आणि म्हणाले ,’एका छोट्या कामासाठी एवढा पाठपुरावा करूनही एवढी टाळाटाळ करणारे पुणे म.न.पा.चे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अत्यंत मुजोर व कामचुकार आहेत
पुणे शहरात भा.ज.प.सत्ताधाऱ्यांना विरोधकांपेक्षा अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांकडून जास्त धोका आहे .
……… बालवडकरांची हि एकट्याची व्यथा निश्चित नाही , पण एकीकडे अधिकाऱ्यांना धमकावून , त्यांना लाथा घालून कामे करवून घेणारे च नाही तर बेकायदा कामांवर कारवाई करू नये म्हणून धाक ठेवणारे काही महाभाग नगरसेवक ही याच महापालिकेत आहेत … मग या सर्वांनी असेच महाभाग बनण्याची वाट प्रशासनातील कदाचित काही धेंडं पाहत असावीत असेच अशा घटनांनी दिसून येते .
……… बालवडकरांची हि एकट्याची व्यथा निश्चित नाही , पण एकीकडे अधिकाऱ्यांना धमकावून , त्यांना लाथा घालून कामे करवून घेणारे च नाही तर बेकायदा कामांवर कारवाई करू नये म्हणून धाक ठेवणारे काही महाभाग नगरसेवक ही याच महापालिकेत आहेत … मग या सर्वांनी असेच महाभाग बनण्याची वाट प्रशासनातील कदाचित काही धेंडं पाहत असावीत असेच अशा घटनांनी दिसून येते .