पुणे :कात्रज च्या जवळील काही गावांच्या राजकारणावरून महापालिकेच्या मुख्य सभेत पुणेकरांच्या पैशातून राजकीय डावपेच खेळण्याचे कारभार सुरु असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा परिणाम म्हणून पुणेकरांच्या तिजोरीतून काल १० कोटीचा डल्ला मारण्यात आला .दरम्यान सुभाष जगताप यांनी तर यास मुख्य सभेतच हा दरोडा असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले आहे .दरम्यान खरे तर हद्दीबाहेरच्या गावांमधील बेकायदा बांधकामे करणाऱ्यांसाठी हे १० कोटी वापरले जाणार आहेत. तेथील बांधकामांना या पैशातून ड्रेनेज लाईन फुकटात मिळवून दिली जाणार आहे . यामुळे येथील बांधकामांचे दर हि वाढणार आहेत . पण हे सारे केवळ राष्ट्रवादी आणि मनसे च्या नगरसेवकांना बदनाम करून पुढील निवडणुकीच्या दृष्टीने मतांचे राजकारण करण्यासाठी होते आहे हे दुदैव आहे . अर्थात याबाबत राजकीय दृष्टीने न राष्ट्रवादी आणि मनसे यांनी प्रस्तावाला पाठिंबाच दिला आहे .
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतगेल्या काही दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतींना दहा कोटी रुपये देण्याचा भाजपचा प्रस्ताव बहुमत असतानाही गुंडाळला गेला होता . अर्थात त्यावेळी नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला नव्हता . पण काल मात्र मुस्कटदाबी सहन करीत भाजप सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून तो संमत केला .
हा प्रस्ताव शुक्रवारी पुन्हा सभेत आणण्यात आला, विषयाला फारसा विरोध न करता मोरे यांनी उपसूचना मांडत, कदम यांच्या प्रस्तावातील दहा कोटींमूधन दोन कोटी रुपये कात्रज तलावाच्या कामासाठी मागितले. तेव्हा `हा प्रस्ताव लोकांच्या मागणीनुसार मांडला आहे. मात्र, काही मंडळी राजकीय द्वेषापोटी कामात खोडा घालत आहेत. कामे अडविण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न ते करीत आहेत. ते योग्य नाही,’ अशा शब्दांत नगरसेविका मनिषा कदम यांनी मोरेंवर हल्ला केला. त्यानंतर मोरे यांनी आपली बाजू मांडली आणि कदम यांचे आरोप खोडून काढले. “विकामसकामात राजकारण केले नाही, करणार नाही. तरीही, माझी बदनामी होत असेल तर, वसंत मोरे यांची दोस्ती बघितली आता, दुश्मनी बघाल’ असा दमच मोरे यांनी भरला.
यावेळी मोरे यांनी केले भाषण पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात ….

