पुणे-कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो रेल्वेचे यार्डच करण्यात येईल. लगतच्या सर्वे नंबर 99 व 100 मधील बीडीपी क्षेत्रात शिवसृष्टी करूयात. यासाठी आरक्षण बदल व जागा ताब्यात घेण्यासाठी येणारा खर्च याचा विस्तृत आराखडा तयार करावा असा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले. यामुळे मेट्रो आणि शिवसृष्टी या दोन्हीचा मार्ग अलग आणि स्पष्ट झाला आहे याचा जल्लोष महापालिकेत भाजप कडून करण्यात आला.
तर दुसरीकडे चांदणी चौकातील BDP मधील जागेत शिवसृष्टी आणि मेट्रो डेपो, या दोन्हीचं उद्घाटन एकाच वेळी होईल अशा दृष्टीने काम करण्याच्या अटीवर आपण शिवसृष्टीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.BDP ची जागा महापालिकेला ताब्यात घेण्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी देणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय लवकरच वनाजपासून चांदणी चौकापर्यंत मेट्रो मार्ग वाढवण्यात येणार असून शिवसृष्टी स्थानकाची निर्मिती होणार आहे. म्हणजेच मेट्रोची पहिली मार्गिका शिवसृष्टी ते रामवाडी अशी नावारूपाला येणार आहे. त्यामुळे आपलं ११ फेब्रुवारीपासून होणारं नियोजित आंदोलन आपण तूर्त स्थगित करत आहोत.असे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी म्हटल्याचे वृत्त आहे .
महापालिकेने कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु महामेट्रोने या जागेवर मेट्रो डेपोचे नियोजन केले आहे. महापालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी आणि या जागेवर शिवसृष्टी उभारावी यासाठी नगरसेवक दीपक मानकर आणि कोथरूड येथील नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांन सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मुंबई येथील सह्याद्री भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
टिळक म्हणाल्या, कि मेट्रो यार्ड चे काम त्याच ठिकाणी होईल. तसे तांत्रिक नियोजन करूनच आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम थांबवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी विरोधकांना केले. या जागेलगतच बिडीपी चे क्षेत्र आहे. यापैकी 28 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याचे नियोजन करू. यासाठी आरक्षण बदल करण्यासोबत भूसंपादनासाठी येणारा खर्च याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिला.
मेट्रोचे अधिकारी तसेच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी यावेळी अनुक्रमे मेट्रो व शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रेसेंटशन केले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यावेळी उपस्थित होते.