पुणे –
अगोदर २४०० कोटी ची थकबाकी वसुलीसाठी मनापासून प्रयत्न करा ..नंतर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांकडे पहा ..असा स्पष इशारा देत आणि प्रशासनाला चपराक देत स्थायी सामितीने आज प्रशासनाने सुचविलेली मिळकत करतील १५ टक्के करवाढ फेटाळून लावली . स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढील कालावधीत थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा असा आदेश प्रशासनाला दिला आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असल्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिळकत करात आणि पाणीपट्टीत प्रत्येकी १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता. तो आज झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेत फेटाळण्यात आला आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी दरवर्षीच्या कर निश्चितीला २० फेब्रुरवारीच्या आत मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी हा करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. चालू आर्थिक वर्षात पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालण्यासाठी २०१८-१९ या वर्षात मिळकत करात वाढ करणे आवश्यक आहे. मिळकत करात एकूण १५ टक्के वाढ सूचविली आहे. त्यात सर्वसाधारण करात चार टक्के, सफाई करात साडेचार टक्के, अग्निशामक करात अर्धा टक्के, जललाभ करात सव्वा टक्के, जलनिस्सारण लाभ करात अडीच टक्के आणि मनपा शिक्षण करात सव्वादोन टक्क्यांचा समावेश आहे.