पुणे- मुलींच्या शिक्षणाची गंगोत्री सुरु करणाऱ्या सावित्री फुले यांच्यावर ज्या पुण्यात दगडे ,शेण भिरकावले गेले त्याच पुण्यात अजूनही सावित्री माई यांना क्लेश होईल असे वर्तन केले जाते आहे काय ? असा प्रश्न निर्माण होईल अशी हि बातमी आहे . पुणे महापालिकेची भवानीपेठ येथे शाळा आहे , ज्या शाळेला सावित्रीमाई यांचे नाव दिलेले आहे . काल पासून येथील माध्यमिक च्या वर्गात परीक्षा सुरु झालेल्या असताना ..एकीकडे विद्यार्थी परीक्षा देत असताना महापौर चषक कॅरम स्पर्धेचा दणदणाट येथे आज सकाळ पासून सुरु झाला आहे . सावित्री माई यांचे नाव असून हि या शाळेच्या विद्यार्थ्यांना या अशा शिक्षणाला उपद्रव करणाऱ्या गोष्टींचा सामना करत येथे परीक्षेला सामोरे जावे लागत आहे .. पहा हा अल्पसा पण बोलका व्हिडीओ