पुणे-सायकल योजनेचा ठराव बेकायदेशीरपणे मंजूर करून त्यास विरोध करनाऱ्यांवर दबाव आणण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आज एका बैठकीत केल्यानंतर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत निव्वळ स्टंट बाजीचे राजकारण करू नका असे सांगत संताप व्यक्त केला .
शहरातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या सायकल शेअरिंग योजनेला महापालिकेतील विरोधीपक्षाकडून विरोध होत असल्याचा प्रचार करून काही संस्थेच्या माध्यमातून विरोधीपक्षातील नेत्यांना ट्रोल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला. पुणे महापालिकेच्या सभागृहात आज सायकल आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
चेतन तुपे यांनी कॉंग्रेस चे नगरसेवक अविनाश बागवे यांच्याप्रमाणे च आक्षेप घेत म्हणाले ,’शहरातील काही समाजसेवी संस्था महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ‘We Support Cycle’ असे कॅम्पेन चालवत असून यामध्ये विरोधी पक्षाचा सायकल योजनेला विरोध असल्याचे सांगत विरोधीपक्षतील नेत्याचे नंबर देऊन मसेज करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे. अशा प्रकारचे अनेक मेसेज त्याना प्राप्त झाल्याचे ते म्हणाले.
पुणे महापालिका शहरातील नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध होण्यासाठी पब्लिक सायकल शेअरिंग सिस्टम योजना राबविण्याचे नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवालला (डीपीआर) मुख्यसभेची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या सायकल आराखड्याचे सादरीकरण देण्यात आले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे आज सभागृहात सर्व सभासदांसाठी सायकल आराखड्याचे सादरीकरण सादर करण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी योजनेला आपला पाठिंबा आहे मात्र ज्या प्रकारे योजना राबवण्यात येत आहे त्याला आपला विरोध आल्याचे सांगितले, तसेच या योजनेत अनेक त्रुटी असून त्याच्या दुरुस्तीनंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली