पुणे- मायमराठी ने गेल्यावर्षात एका ‘तोतया’ कामगाराला महापालिकेच्या मुख्य इमारतीतील मिळकत कर विभागात काम करताना रंगेहाथ पकडून दिल्यानंतर , अशाप्रकारचे ७८ तरुण कामगार महापालिकेच्या अधिकृत नेमणूकपत्रा शिवाय ,महापालिकेच्या तिजोरीतून पगार न घेता , प्रत्यक्षात महापलिकेच्या मुख्य इमारतीत महत्वाच्या खात्यात ,टेबल आणि संगणकाचा वापर करीत अधिकृत कर्मचारी असल्याप्रमाणे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे .विशेष म्हणजे हे कामगार ठेकेदाराकरवी सुद्धा कामावर नसल्याचे समजते . या सर्वांना त्या त्या विभागातील अभियंते, खाते प्रमुख किंवा महापालिकेची विविध कामे मिळविणारे ठेकेदार आपापल्या उत्पन्नातून पगार देत असल्याचे वृत्त आहे .
शहर नियोजनाचे महत्वाचे काम करणाऱ्या बांधकाम विभागात अशा ‘बोगस ‘ म्हणजे निराधार कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असून यामध्ये तरुणींचा मोठा भरणा असल्याचे हि समजले आहे .कामाच्या गरजेपोटी बेरोजगार तरुणींना अशा प्रकारे महापालिका वापरून घेत असताना विशेष म्हणजे पालिकेच्या कामगार संघटना देखील का गप्प आहेत हे समजू शकलेले नाही .काम हवे म्हणून तरुणाई हा बेकायदा प्रकार सहन करून घेत आहे . तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची महापालिकेलाही गरज आहेच पण कायदेशीररीत्या भरती करता येत नाही असा बहाणा देवून अशा प्रकारे बेकायदेशीरपणे तरुणाईचा महापालिका वापर करून घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे .
यातील बहुतेक सर्व कामगार पूर्वी खाजगी ठेकेदारामार्फत म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून त्यांना महापालिकेत कामावर घेण्यात आले होते . पण त्यांचे कंत्राट संपल्यानंतरही ते अद्यापही ‘अशा
‘पद्धतीने महापालिकेत काम करत असल्याचे दिसून आले आहे .
या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिका बेरोजगार तरुण तरुणींना कायदेशीररीत्या काम देण्याएवजी ‘बोगस कामगार ‘ म्हणून घडविण्याचा उद्योग करीत आहे काय ? असा प्रश्न या निमिताने पुढे उभा राहणार आहे .
पहा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट …
नेमणूकपत्र नसताना महापालिकेत काम करतात ७८ कामगार ( व्हिडीओ रिपोर्ट )
Date:

