पुणे- मुंबई महापालिके प्रमाणे पुणे शहरातील सहाशे चौरस फुटांच्या घरांना मिळकत करातून सूट द्यावी असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक बाळा ओसवाल, प्राची आल्हाट आणि पालवी जावळे यांनी स्थायी समितीला दिला आहे.दरम्यान असाच प्रस्ताव पूर्वी महापालिका आयुक्त यांनी फेटाळून लावलेला आहे . अशा करमाफीने निर्माण होणारी तुट भरून काढता येणार नाही असा दावा तेव्हा त्यांनी केला होता .
पुणे महापालिका क्षेत्रात असणाऱ्या ६०० चौरस फुटांच्या सदनिकांना मुंबई प्रमाणे सूट द्यावी असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवकांकडून देण्यात आला आहे. पुणे महापालिकेने केल्या काही वर्षात भोगवटा पत्र न घेता वापर केलेल्या घरांना पालिकेतील प्रचलित धोरणानुसार आकारण्यात आलेला ३०० ते ४०० कोटींचा दंड माफ करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने ६०० चौरस फुटांच्या घरांना मिळकत करात सूट देण्यास हरकत नाही असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.