पुणे-
एकीकडे बेरोजगार करायचे दुसरीकडे रोजगार मेळावा घ्यायचा अशा स्वरूपाच्या पुणे महापालिकेच्या फसव्या कारभाराविरोधात मनसे आंदोलन करणारअसल्याचे आज मनसे चे नगरसेवक वसंत मोरे तसेच साईनाथ बाबर आणि रुपाली पाटील यांनी एका निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना कळविले आहे .
मॉडर्ण महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या 7 जानेवारी रोजी महापालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे . एकीकडे स्मार्ट संस्थेचे २३० कर्मचारी तसेच सुरक्षा विभागाचे 500 कर्मचारी ,विद्युत विभागाचे २९ बात्तीवाले,शिक्षण मंडळाचे १३० शिपाई महापालिकेने कामावरून काढून टाकले आहेत . याबाबत अनेकदा आवाज उठवूनही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे . आणि दुसरीकडे असे रोजगार मेळावे घेवून गजब कारभार चालविला आहे . जोपर्यंत काढून टाकलेल्या कामगारांना परत कामावर घेत नाही तोपर्यंत हि नौटंकी बंद करावी अन्यथा मनसे च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे . पहा याबाबत नेमके वसंत मोरे यांनी काय म्हटले आहे ….