पुणे- महापालिकेच्या कारभाराची लक्तरे उघड्यावर पडत आहेत . सायकल मार्गासाठी जसा सुपरफास्ट कामकाज सुरु आहे तसाच आणखी एक प्रकार महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागात दिसतो आहे. ज्याचा आज शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी गौप्यस्फोट केला . टेंडर प्रोसेस झालेली असताना वर्क ऑर्डर मिळेपर्यंत हि बाबाला चैन पडेना .. कमाईचे वेध लागलेल्या ठेकेदाराने वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच जाहिरातींचे फलक लावून मोकळा हि झाला .. त्यामुळे हे सारे जाहिरात फलक बेकायदा ठरले आहेत . मात्र आकाश चिन्ह विभागाचे तुषार दौंडकर याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप हि ओसवाल यांनी केला ..नेमके ओसवाल काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका ….