पुणे-‘कोंढवा, कोथरूड, औंध, पाषाण, बावधन, खराडी याबरोबरच शहरातील मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी टेरेसवर लाकडी शेड आणि कापड टाकून बेकायदा पद्धतीने हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. बेकायदापणे सुरू केलेल्या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’ अशी सूचना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे.
मुंबई येथे हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेत अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी, अशी सूचना धेंडे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या बांधकाम नियमावलीमध्ये इमारतीच्या टेरेसवर कोणत्याही प्रकारचे हॉटेल व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे पालिकेने कोणालाही टेरेसवर हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. शहरातील अनेक भागात मोठ्या संख्येने टेरेसवर हॉटेल असल्याचे समोर आले आहे. यावर पालिका कारवाई करत नसल्याने बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना कोणताही चाप बसत नाही. बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या हॉटेल्सला कोणाच्याही ना हरकत प्रमाणपत्राची गरज पडत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून हे व्यवसाय सुरू असून पालिकेतील अधिकारी देखील जबाबदार असल्याचा आरोप धेंडे यांनी केला.
टेरेसवर हॉटेल उभारताना लाकडी शेड आणि कापडाचा वापर केला जात असल्याने मुंबईसारखी दुर्घटना घडल्यास त्याची मोठी किंमत पालिका आणि नागरिकांना चुकवावी लागणार आहे. यापूर्वीही टेरेसवर बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे धेंडे यांनी सांगितले. या बेकायदा हॉटेल्सवर कारवाई करून संबधित मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

एनओसी मिळकतींचे तातडीने फायर ऑडिट
शहरातील मोठी हॉटेल्स, क्लब, रेस्तरॉं तसेच पालिकेच्या अग्निशमन विभागाने ज्या मिळकतींना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिलेल्या आहेत, अशा मिळकतींचे तातडीने ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरातील ज्या मिळकतींनी बेकायदा बांधकाम करून वापर सुरू केला आहे, अशा मिळकतींवर कारवाई करून त्यांचेही ऑडिट करावे, असे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.
मुंबई येथील कमला मिल्स परिसरातील रेस्तरॉंला लागलेल्या आगीत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेने ज्या वापरासाठी परवानगी दिली आहे, त्याऐवजी अन्य गोष्टींसाठीच जागांचा वापर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्तरॉं यांना दिलेल्या एनओसीची तपासणी करून फायर सेफ्टी ऑडिट करावे. यासाठी अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी आवश्यकतेनुसार विशेष पथकांची नेमणूक करून कार्यवाही सुरू करावी. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतींची पाहणी करुन मान्य नकाशाप्रमाणेच बांधकाम झाले आहे की नाही, याची पाहणी करावी.
पालिकेची परवानगी न घेता व्यावसायिक कारणांसाठी मिळकतींचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना केल्या आहेत. पालिकेतील आरोग्य विभागातील सहायक आरोग्यप्रमुखांनी ज्या उद्देशाने नागरिकांनी पालिकेकडून परवानगी घेतली आहे. त्या व्यतिरिक्त त्या इमारतीमध्ये हॉटेल्स, नर्सिंग होम, हॉस्पिटल सुरू असल्यास तातडीने कारवाई करून वापर तातडीने थांबवावा. पालिकेतील तिन्ही विभागाच्या प्रमुखांनी केलेल्या कारवाईचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत पालिका आयुक्तांसमोर सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.