पुणे- मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नका -अजूनही जागे व्हा – एकटा होता तो एकटा … तुमचे सारे मुख्यमंत्री, देशाचे असून केवळ गुजरातचेच बनून राहिलेले पंतप्रधान असं सांर सामर्थ्य एकवटूनही
त्या एकट्याने तुमचं शतक ही होऊ दिलं नाही … धोक्याची घंटा ओळखा …अजूनही जागे व्हा … गोध्रा च्या वेळी ज्यांनी नरेंद्र मोदींना वाचवीलं, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्रात मोठं केलं ,त्यांचा विसर पडू देवू नका .. आता वर्षभरात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत … अशा कडक शब्दात ,बोचणाऱ्या वाक्यातला इशारा हसतमुखाने शिवसेना गटनेते संजय भोसले पुणे महापालिकेच्या मुख्य सभेतून भाजपला दिला.
गुजरात आणि हिमाचल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा अभिनंदन करणारी तहकुबी पालिकेच्या मुख्य सभेत मांडण्यात आली . तेव्हा या तहकुबीवर भाषण करताना भोसले यांनी भाजपला हे बोचकारे ओढले … पहा आणि ऐका …