पुणे
आज मुख्य सभेत घनकचरा उपविधी आणि प्रामुख्याने ३२० कोटीची सायकल योजना संमत करून घेताना सभा कामकाज नियमावली गुंडाळून बेकायदा कामकाज करण्यात आल्याचा आरोप सर्व विरोधी पक्षांनी केला . सभा संपताच विरोधी नगरसेवकांनी प्रभारी नगरसचिव शेवाळे यांना कार्यालयात घेरावो घालत भाजपच्या दबावाखाली काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला .उपसूचना मंजूर करणे ,स्वीकारणे ,सभा तहकुबी स्वीकारणे ,फेटाळणे,त्यावर मतदान घेणे , प्रस्तावावर मतदान घेणे अशा विविध बाबींसाठी त्यांनी प्रभारी नगर सचिवांना फैलावर घेतले .एकीकडे अशा पद्धतीने बेकायदा कामाचा ठपका त्यांच्यावर ठेवत असताना सायकल प्रस्तावाच्या बाजूने झालेले मतदान पाहता ते केवळ ६६ एवढेच झाल्याचे निष्पन्न झाले .भाजपने या प्रस्तावासाठी व्हीप काढला होता . ९८ नगरसेवक भाजपचे असताना ६६ च मते कशी मिळाली हा देखील राजकीय चर्चेचा विषय ठरला . दरम्यान एकूण १४४ नगरसेवक या सभेला हजर होते त्यापैकी ६६ जणांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले . विरोधात कोणीही केले नाही असे हि नगरसचिव यांनी स्पष्ट केले ..
पहा हा व्हिडीओ….

