पुणे- कोतवाल चावडी पाडली ,मिनर्व्हा सिनेमागृह पाडण्यात आले,शिवाजी रस्त्याचे रुंदीकरण झाले पण एकेकाळी लक्ष्मी रस्त्याचे रुंदीकरण स्थगित झाले , एकेकाळी लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांच्या दुकानांमधील पोटमाळे दंड आकारून नियमित करण्यात आले . आता लक्ष्मी रस्त्यावरील पथारीवाल्यांना महापालिकेकडून अधिकृत जागा देण्याचा प्रयत्न होतो आहे . यानिर्णया मुळे कायम अनधिकृत म्हणून हिणविल्या गेलेल्या पथारीवाल्यांना अधिकृत पणे हक्काची जागा यापुढे व्यवसायासाठी मिळणार आहे .
शहरातील २७ हजार पथारीवाल्यांपैकी २१ हजार पथारीवाल्यांची अधिकृत नोंद महापालिकेने केली असून १९० ठिकाणी हॉकर्स झोन करून या ठिकाणी १० हजार पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे काम महापालिकेने हाथी घेतले आहे . यापैकी शहराचा सर्वाधिक महत्वाचा आणि मध्यवस्तीतला रस्ता असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर २७२ पथारीवाले अधिकृत ठरवून त्यांचे पुनर्वसन लक्ष्मी रस्त्यावरच करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरु केले आहे . मात्र यासाठी दुचाक्या लावण्यासाठी असलेली एक बाजू वापरण्यात येणार असल्याने सध्या असलेली लक्ष्मी रस्त्यावरील दुचाकी पार्किंग ची स्पेस मात्र काही प्रमाणात कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे नागरिकांनी जवळच्या वाहनतळाचा उपयोग करावा अशी महापालिकेची सूचना असणार आहे .या संदर्भात महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे . ….
लक्ष्मी रस्त्यावरील २७२ पथारीवाल्यांना मिळणार लक्ष्मी रस्त्यावरच अधिकृत जागा ..(व्हिडीओ)
Date:

