पुणे- वादग्रस्त म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंडेंनी ‘मी फक्त कामालाच महत्व देतो असे अधोरेखित करत ,लोकप्रतिनिधींना टार्गेट करत अफाट प्रसिद्धी मिळविली . याच मुंडे यांनी पुण्यात पीएमपीएमएल ला आल्यावरही हाच धडाका सुरु ठेवला आहे . स्कूलबसच्या दरात वाढ करून आता त्यांनी पुण्यातील लोकप्रतीनिधींचा रोष ओढवून घेतला आहे . मुंढे कोणाचेच ऐकत नाही ..हे सोडा… पण ते कोणालाही विचारात न घेता स्वतः ला वाटेल तेच निर्णय घेतात आणि त्याबाबत स्पष्टीकरण देणेही बंधनकारक मानत नाही असा त्यांचा स्वभाव स्कूल बस दरवाढीच्या प्रकारातून दिसून आला आहे . काल महापलिकेत विद्यार्थ्यांचे या दरवाढीविरोधात आंदोलन झाले . मुख्य सभेत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मुंडे यांच्या मनमानीवर ताशेरे ओढले ..तेव्हा आज सायंकाळी 4 वाजता महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीएमएल ची बैठक बोलाविली होती . या बैठकीस मुंडे यांना उपस्थित राहण्याचे कळविले होते . पण ऐनवेळी मुंढे यांनी मला काम आहे असे सांगत स्वारगेट येथील कार्यालयातच ठिय्या मांडून राहिले आणि आपले प्रतिनिधी येतील त्यांच्याशी बोला असे सांगत अवघ्या 1 महिन्यानंतर निवृत्त होणारे धारूरकर आणि वाहतूक व्यवस्थापक गवळी यांना पाठविले . अखेर यांच्याशी चर्चा न करता महापौर ,तसेच उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हि बैठक आटोपती घेतली .

