पुण्यात गृह निर्माण योजनेच्या कामाना गती नाही -आ.चंद्रकांत दादा पाटील (व्हिडिओ)

Date:

 

पुणे : एस आर ए आणि पंतप्रधान आवास योजनेचे काम पुण्यात अजूनही समाधान कारक नसल्याचे स्पष्ट करीत, पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी एसआरए योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या कोथरुड नागरी सत्कार सोहळ्यात श्री. पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,खासदार गिरीष बापट, , माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना नेते आणि माजी मंत्री शशिकांत सुतार, सिनेनाट्य अभिनेते विक्रम गोखले यांसह इतर अनेक पक्षांचे, विविध संस्थांचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्री पाटील म्हणाले की, पुण्याचे शहरीकरण जसे वाढत आहे, तसे झोपडपट्ट्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघात जवळपास ८० हजार मतदार झोपडपट्टीत राहत आहेत. त्यामुळे यांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन पुण्याला झोपडपट्टी मुक्त शहर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपला मतदारसंघ समस्या मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना करतात. त्यानुसार गेल्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही कोल्हापूरमध्ये अनेक उपक्रम राबविले. यामुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले. असेच काम आता पुण्यात देखील उभारले पाहिजे. त्यासाठी मुरलीधर अण्णांना खूप मोठी राजकीय संधी आहे, त्यांचे राजकीय आयुष्य मोठे आहे, आमचे त्यामानाने 5/10 वर्षे आहेत पण अजुन त्यांना आमदार, खासदार, राज्यात , केंद्रात मंत्री होण्याची संधी आहे त्यामुळे सर्वांना बरोबर घेवून जनहिताची काम करावीत. इव्हेन्ट मैनेजमेंट वर या पुढे निवडणुका जिंकता येणार नाहीतच असे ही ते म्हणाले.

दरम्यान, कोथरूडमध्ये सांस्कृतिक कला केंद्र उभारण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत असल्याबद्दल श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या कला केंद्रात प्रशिक्षण केंद्र देखील कार्यन्वित केले जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू...