पुणे :
राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या लोकहिताच्या प्रश्नाच्या ई – मेलला उत्तर देताना चव्हाण यांना उद्धट संबोधणाऱ्या पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दीपक बिडकर आणि सचिव ललित राठी यांनी पत्रकाद्वारे केली आहे
कुणाल कुमार (पुणे मनपा ,आयुक्त) यांनी राज्यसभा खासदार. वंदना चव्हाण यांना इमेल उत्तरात असे लिहिलेय की ,त्या जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्यातून त्या ‘उद्धट ‘ वाटतात! हा उघड उपमर्द आहे. लोकप्रतिनिधीचा, राज्यसभेच्या म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याचा, तोही लेखी -टाकी. ही भयंकर चूक कुणाल कुमार यांची आहे.
प्रोटोकॉल, आय ए एस अधिकाऱ्याची कार्यकक्षा,लोकशाही संकेत पाहता कुणाल कुमार मोठी चूक करताहेत. याकरिता कुणाल कुमार यांनी माफी मागावी अशी संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे .
पुणेकर नागरिक हे सच्च्या,प्रामाणिक आणि लोकहिताचे मुद्दे मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीचा उपमर्द सहन करणार नाही
दरम्यान खासदार वंदना चव्हाण यांचा अपमान म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधी महिलांचा अपमान आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

