अडीच महिन्यानंतरही पूरग्रस्तांबाबत अनास्था ; सर्वपक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

Date:

पुणे-अडीच महिने होऊनही महापूरग्रस्तांन महापालिका प्रशासनाने कोणतीही मदत केली नाही, आशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आज आगपाखड केली. महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.नगरसेविका राणी भोसले यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सर्व पक्षीयांनी आपापल्या तीव्र भावना व्यक्त केल्या .तातडीने यांचे पुनर्वसन महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ५००० मोकळ्या सदनिकांमध्ये का रत नाहीत ? असा सवाल माजी उपमहापौर दीपक  मानकर यांनी केला तर धीरज घाटे यांनी पूरग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा नाहीतर त्यांच्यासह मी तुमच्या कार्यालयातच राहायला येईल असा इशारा दिला .यावेळी पूरग्रस्त नागरिकांना केलेली मदत आणि नाल्यावर झालेल्या बांधकामांचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन  अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.

(महापालिकेची मुख्य सभा https://www.facebook.com/MyMarathiNews/ या आमच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केलेई आहे .तिथे वाचक दर्शकांना ती पाहता येईल ..)

यावेळी सुभाष जगताप म्हणाले, या महापुरामुळे शेकडो नागरिकांचे नुकसान झाले. टांगेवला कॉलनीत 6 नागरिकांचा जीव गेला. किती नुकसान झाले, याची महापालिकेकडे माहितीच नाही. आंधळा, हलगर्जीपणा कारभार चाललंय. अतिक्रमणे होऊ न देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अडीच महिने झाले, संसार उध्वस्त झाले, आता हे नागरिक उघड्यावर आलेत. वेदना हरवून प्रशासन बसले का? नैसर्गिक आपत्ती ही शासनाची मदत असल्याचे सांगतात. या पूर्वी महापालिकेने मदत केली. उपयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून तातडीने मदत करा, अरणेश्वर मंदिर शेजारी पूल हाइट फार कमी आहे. ग्रे वाटर ओढ्यातच केले, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. महापालिकेने जो उपद्व्याप केला. त्याची निवृत्ती न्यायाधीशामार्फत चौकशी करा, अशीही मागणी त्यांनी केली.

धीरज घाटे म्हणाले, आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. पाणी शिरल्यामुळे होत नव्हतं सर्व वाहून गेले. अडीच महिने झाले तरी पुनर्वसन नाही. आयुक्त तुम्ही एक दिवस तरी महापालिका शाळेत राहू शकाल का? सभासदांनी नेमके काय करावे म्हणजे त्यांना जाग येईल, कालवा फुटीमुळे सीमाभिंत फुटल्या. या भिंती बांधणार आहोत की नाही, याचा खुलासा करावा.

राणी भोसले म्हणाल्या, 25 सप्टेंबर रोजी आलेल्या पुराला आता दोन महिने पूर्ण झाले. प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या?, अतिक्रमणावर कारवाई होणार होती, त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माजी महापौर दत्ता धनकवडे म्हणाले, या महापूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे काय पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही तुटपुंजी मदत मिळाली. महापालिकेने नागरिकांना मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महेश वाबळे म्हणाले, या महापुरात कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. सोसायट्यांच्या सीमाभिंतिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना टॅक्समध्ये सवलत देण्यात यावी.

हरिदास चरवड म्हणाले, प्रायेजा सिटीजवळील रस्ता वाहून गेला. त्यामुळे सिंहगड रस्ता, नांदेड सिटीकडे प्रवास करता येत नाही. तर, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. वॉर्ड ऑफिसला तक्रार करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे प्रमोदनाना यांनी सांगितले. नंदा लोणकर, हाजी गफूर पठाण, भैय्या जाधव, राजश्री शिळीमकर, मनीषा कदम, सुशील मेंगडे यांनीही नाराजी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...