पुणे – शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त
भारतातील एक आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने आज व्होडाफोन इको-पाँड्स हा उपक्रम सुरू केला. श्री
गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यास नागरिकांना साह्य करण्यासाठी व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि
गोवा परिमंडळाने पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांच्याशी भागीदारी केली आहे.
व्होडाफोनने शहरातील आठ व्होडाफोन स्टोअर्समध्ये व्होडाफोन इको-पाँड्स या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या उभारल्या
आहेत. एक प्रमोटर आणि एक लाइफ गार्डही त्यासोबत असेल. पुणेकरांना कोणत्याही एका व्होडाफोन स्टोअरमध्ये श्री
गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाता येईल. तेथे त्यांना विसर्जनासाठी साह्यही करण्यात येईल.
जंगली महाराज रस्ता, हिराबाग, वाकडेवाडी, औंध, कर्वे रस्ता, एनआयबीएम रस्ता, कल्याणीनगर आणि खराडी येथील
व्होडाफोन स्टोअर्समध्ये व्होडाफोन इको-पाँड्स तयार केली आहेत. याशिवाय भाविकांना ७३९१०००००० या
क्रमांकावर संपर्क साधूनही व्होडाफोन इको-पाँड्सचा पत्ता जाणून घेता येईल. याव्यतिरिक्त एक मोबाइल विसर्जन व्हॅनही
सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि वृद्धाश्रमांत देखील या
व्हॅनद्वारे विसर्जनासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
व्होडाफोन इको-पाँड्सचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप आणि
सीएसआयआर-एनसीएलच्या कॅटॅलिसिस विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी बी. उंबरकर यांच्या हस्ते आणि
व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांच्या उपस्थितीत झाले.
या उपक्रमाबाबत बोलताना आशिष चंद्रा म्हणाले, ‘गणेशोत्सव हा पुण्यात साजरा होणारा एक मोठा उत्सव आहे. यंदा
१२५ वे वर्ष असल्याने तर तो अधिकच खास आहे. या उत्सवाचा आम्हीही एक भाग असल्याचे आम्ही मानतो. मात्र,
त्याच जोडीने पर्यावरणावर होणा-या परिणामांबाबतही जागरूक राहणे गरजेचे आहे. जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत म्हणून
नागरिकांना घरच्या घरी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास प्रोत्साहन देण्यात पुणे महापालिका आणि एनसीएलने
पुढाकार घेतला आहे. या पुढाकाराला साह्य करताना व्होडाफोनला अतिशय आनंद होत असून, नागरिकांना श्री
गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी व्होडाफोन इको-पाँड्सच्या माध्यमातून साह्य करण्यात येणार आहे.
आपल्या जवळच्या व्होडाफोन इको-पाँडमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला
पर्यावरणपूरक निरोप द्यावा, असे आवाहन मी पुणेकरांना करतो.’
डॉ. शुभांगी बी. उंबरकर म्हणाल्या, ‘एनसीएलने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेचा प्रसार
करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वप्रथम मी एनसीएलच्या वतीने व्होडाफोनच्या टीमचे आभार मानते. हा एक
सामाजिक प्रकल्प असून, सीएसआयआर-एनसीएलने पुणे महापालिकेच्या सहकार्याने यावर तीन वर्षे काम केले आहे.
गेल्या वर्षी अनेकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, 25 हजार ते 30 हजार नागरिकांनी त्यांच्या घरी
या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. मात्र, पुणे शहराची एकूण लोकसंख्या पाहता, ही संख्या आणखी काही पटींनी वाढणे
गरजेचे असून, व्होडाफोनने घेतलेल्या पुढाकारामुळे याला नक्की चालना मिळेल. मातीची गणेशमूर्ती तयार करा किंवा
पीओपीची मूर्ती असेल, तर त्याचे विसर्जन करण्यासाठी सीएसआयआर-एनसीएलने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक
विसर्जन प्रक्रियेचा वापर करा, असे आवाहन मी या निमित्ताने सर्वांना करते.’
सुरेश जगताप म्हणाले, ‘एनसीएलने विकसित केलेल्या गणेशमूर्ती विसर्जन पद्धतीला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो
आहे. नागरिक आता पर्यावरणाबाबत अधिक जागरूक असून, सकारात्मक परिणाम असलेल्या नव्या पद्धती ते आजमावून
पाहत आहेत. हा नवा उपक्रम सुरू केल्याबद्दल मी व्होडाफोनची प्रशंसा करतो, तसेच पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतीचा
प्रसार करण्यासाठी मदत करत असल्याबद्दल आभारही मानतो.’
.
परिशिष्ट
व्होडाफोन इको-पाँड्सची यादी(स्टोअर पत्ता)
जे एम रोड शॉप क्र. 7, 8, 9स निर्मला हाइट्स, 562/6, शिवाजीनगर, वीर सावरकर भवनसमोर,काँग्रेस हाउसशेजारी, पुणे – 411005
हिराबाग 42ए, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता, हिराबाग चौक रस्ता, पुणे – 411030
वाकडेवाडी द मेट्रोपॉलिटन, एफपी क्र. 27, जुना पुणे-मुंबई महामार्ग, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे –411005
औंध रॉयल रेसिडन्सी, शॉप क्र. 1, 2, 3, 4, औंध रस्ता, खडकी, पुणे – 411020
कर्वे रस्ता रिजंट्स चेंबर, शॉप क्र. 2, 3 आणि 4, सीटीएस क्र. 33/15बी, गरवारे कॉलेजसमोर, कर्वेरस्ता, पुणे – 411004
एनआयबीएम रस्ता शॉप क्र. 8, सी3 विंग, ब्रह्मा मॅजेस्टिक को-ऑप हौसिंग सोसायटी, एस क्र. 15/2/1,सीटीएस क्र. 755, एनआयबीएम रस्ता, कोंढवा, पुणे – 411048
कल्याणीनगर सीएसटी क्र. 2107, एस क्र. 210, शॉप क्र. 6 आणि 7, एफ मॉल, कल्याणीनगर, पुणे -411004.
खराडी एक्स्पर्टाइझ, शॉप क्र. 6, केयूएल स्पेसेस, एसआर. क्र. 8, रिलायन्स मार्टसमोर, खराडी, पुणे- 411014