पुणे – सोशल मिडिया वर इव्हिएम मशिनच्या घोटाळ्यांची चर्चा सुरु असताना भाजपने आजवर असे केले तरी काय ? जे त्यांना तब्बल ९२ जागा मिळाव्यात,स्वातंत्र्यचळवळीतल्या महात्मा गांधींची पार्श्वभूमी असलेल्या कॉंग्रेस ला देखील एवढे पाशवी बहुमत मिळाले नव्हते मग भाजपला कसे मिळाले ? असे प्रश्न उपस्थित करीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचे आरोप करत पुन्हा निवडणूक घेऊन मतदान झालेच पाहिजे अशी मागणी सर्व पक्षीय पराभूत उमेदवारांनी केली आहे.
ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा असल्याचे आरोप करत सर्व पक्षीय पराभूत उमेदवारांची गोखलेनगर येथे भाजप सरकार विरोधात निषेध सभा घेण्यात आली . यावेळी विविध पक्षीयांच्या पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे.
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये भाजपला पूर्णपणे बहुमत मिळाले असून दोन्ही महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळाले आहे. मात्र, निकालापूर्वीच भाजपची एकहाती सत्ता येणार तसे न झाल्यास सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन, असे ठाम मत खासदार काकडे यांनी व्यक्त केले होते. तसेच वाडेश्वर कट्ट्यावर खासदार काकडे यांनी चिठ्ठीत मांडलेले अंदाज 95 ट्क्के जुळल्याने इव्हीएम मशिनमध्ये घोळ केल्याची चर्चा होत होती. मात्र, आता पराभूत उमेदवारांनी तसा सरळ-सरळ आरोप केला आहे.
मात्र, आता जगातील बलाढ्य देशांनी इव्हिएम मशिन नाकारले आहे. तर आपण त्याचा वापर का करायचा, असा प्रश्न पराभूत उमेदवारांकडून उपस्थित केला जात असून बॅलेट पेपर पद्धतीनेच पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची मागणी सर्व पक्षीय मतदारांनी केली आहे.