पुणे – महापालिका निवडणुकीच्या संग्रामासाठीचा प्रचार संपल्यानंतर आज (मंगळवार) निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. शहरात २६ लाख ३४ हजार ८०० मतदार आहेत, ४१ प्रभागांतून १६२ जागांसाठी एक हजार ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी दिली .
दरम्यान हडपसर येथे मतदान यंत्राचीपूजा करण्यात आल्याचा फोटो कुणालकुमार यांच्यापर्यंत पोहोचला असून अशाप्रकरणांवर ते नेमकी काय कारवाई करणार आहेत हे लवकरच समजेल अशी आशा आहे . बंडू गायकवाड आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौर चंचला कोद्रे या फोटोत दिसत आहेत .