पुणे- तत्कालीन नगरसेवक नाना वाबळे यांच्या राजकीय अस्तानंतर सुभाष जगताप नगरसेवकपदी ज्या भागातून विराजमान झाले .. तेथूनच आता नाना वाबळे यांचे सुपुत्र महेश वाबळे जगताप यांना पराभूत करून विजयी झाले आहेत . जगताप यांच्या राजकीय अस्तित्वालाच जणू या निकालाने मोठा धक्का बसला आहे . तर वाबळे यांच्या अनेक वर्षांच्या संयमाला ,मेहनतीला फळ मिळाले आहे .प्रभाग क्रमांक ३५ सहकारनगर पद्मावती मधून कॉंग्रेसचे आबा बागुल ,आणि अश्विनी कदम विजयी झाले तर भाजपचे महेश वाबळे आणि दिशा माने या विजयी झाल्या .