Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कामगारांपेक्षा पीएमपी ला चिंता ठेकेदारांची – विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांचा आरोप

Date:

 पुणे- पीएमपीएमएल प्रशासनाने सेवकांना वेतन न देता इतर ठेकेदार व कंपन्यांचे बिल व वेतन अदा केले आहे. कामगारांपेक्षा ठेकेदारांचेच हित पीएमपी जोपासत आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी येथे केला.

त्या म्हणाल्या , ‘पीएमपीएमएल’च्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 2 हजार 169 कामगारांना पगार मिळालेला नाही. यामध्ये कंड्क्टर, ड्रायव्हर, वर्कशॉपमध्ये काम करणारे सेवक यांचा समावेश आहे. त्यामुळे रोजंदारी पदावरील सेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रोजंदारीवर काम करणारे काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात. या सेवकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस होतो. परंतु, एप्रिल २०२० या कालावधीतील पगार अद्यापही अदा करण्यात आलेला नाही. पगार न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

रोजंदारी सेवकांचा पगार देण्यास ‘पीएमपीएमएल’कडे फंड उपलब्ध नाही. परंतु, पुणे महानगरपालिकेकडून वेतन देण्याचा हिस्सा पीएमपीएमएल प्रशासनाकडे जमा करण्यात आला असूनही सेवकांना वेतन दिले जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.याउलट पीएमपीएमएल प्रशासनाने सेवकांना वेतन न देता इतर ठेकेदार व कंपन्यांचे बिल व वेतन अदा केले आहे.महाराष्ट्र शासन उद्योग उर्जा व कामगार विभाग यांच्याकडून कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार घरी राहावे लागत असले तरी ते कर्मचारी कामावर आहेत, असे समजून त्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात यावे, असा शासनाचा आदेश आहे.त्यामुळे तातडीने पावले उचलून रोजंदारी पदावरील सेवकांना तातडीने पगार अदा करण्यात यावा, असे पत्र पीएमपीएमएल प्रशासनास देण्यांत आले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. पुणे शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.परिणामी सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे पीएमपीएमएलमधील कायम व रोजंदारी पदावरील सेवकांना मार्च २०२० या कालावधीतील पगार अदा करण्यात आलेला होता.वास्तविक प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेस सर्व कायम सेवकांचे पगार अदा करण्यात आलेले आहे. मात्र, रोजंदारीवरील कामगारांचा पगार करण्यात आला नाही. पीएमपीएमएलला कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदार व कंपण्यांचे हित जास्त महत्वाचे असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

गटनेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महापौरांनी कोणताही निर्णय घेऊ नये –

2020-21 च्या संपूर्ण बजेटला महापालिका प्रशासन कात्री लावण्याच्या तयारीत आहे. हे बजेट कमी करण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलेल्या पत्रात केले आहे.

पुणे महापालिकेचे सन 2020-21चे अंदाजपत्रक मंजूर होऊन या संबंधी दि.1 एप्रिलपासून प्रत्यक्ष या अंदाजपत्रकातील विकासकामांना सुरुवात होणे गरजेचे होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बजेटवर परिणाम झाला आहे. सर्व महापालिका प्रशासन या रोगावर मात करण्यात प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन आणखी किती दिवस सुरू राहील, याची कोणतीही शाश्वती नाही.कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द आयुक्तांनीच बजेटचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपण बजेट संदर्भात सर्व पक्ष नेत्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, असेही दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे चक्राकार पद्धतीने ड्यूटी दिली जात नाही
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कोव्हिड रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चक्राकार पध्दतीने सात दिवस प्रत्येकी सहा तासांची ड्यूटी देणे आवश्यक आहे. मात्र, नायडू रुग्णालयासह महापालिकेच्या सर्व रूग्णालये आणि कोव्हिड सेंटरमध्ये या नियमांचे पालन होत नाही.त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर आयुक्तांनी वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.पुणे शहरासह संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नायडू रूग्णालयात गेल्या 3 महिन्यांपासून डॉक्टर, परिचरिका व इतर सेवक कार्यरत आहेत. जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करीत आहेत. सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात राहावे लागत असल्याने मागील 10 दिवसांत 5 परिचरिकांना बाधा झाली आहे. मात्र, प्रशासनातर्फे कोणतीही दाखल घेतली नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...