पुणे-उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन युतीकडून डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उपमहापौर पदासाठी लता राजगुरू यांनी अर्ज दाखल केला आहे.
उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने हे पद रिक्त झाले असून येत्या 14 जूनला उपमहापौरपदासाठी निवडणूक आहे. महापालिकेतील भाजपचे एकूण संख्याबळ पाहता सिद्धार्थ धेंडे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
यावेळी भाजप-रिपब्लिकन युतीकडून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समीती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे,नगरसेविका सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, फरजाना शेख, नगरसेवक बापूराव कर्णे गुरूजी, हनुमंत साठे उपस्थित होते.तर काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे आघाडीकडून विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.