पुणे-नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली केलेल्या तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी रात्री उशिरा नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली केली होती. मुंढे यांच्या जागी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुंढे यांना नवीन ठिकाणी नेमणूक दिली नव्हती. शनिवारी त्यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केल्यापासून तुकाराम मुंढे चर्चेत होते. त्यांच्या बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. मुंढे यांची बदली करण्यासाठी भाजपचे नगरसेवकही आक्रमक झाले होते.