कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्या; पुणे महानगरपालिका कामगार युनियनची मागणी

Date:

पुणे -‘करोना’च्या पार्श्वभूमीवर कामकाज करताना ओळखपत्र नसल्याने पोलिसांच्या बेदम मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यात सात हजार कंत्राटी कामगार गेली १० ते १२ वर्षापासून काम करत आहे. कंत्राटी कामगारांना टेंडरच्या अटीशर्तीला अनुसरून त्यांना सफाईचे अवजारे व गणवेश, ओळखपत्र, वेतन चिठ्ठी, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय व आपघाती विम्याची रक्कम भरावी, असे असतानाही संबंधीत ठेकेदार कोणत्याही प्रकारचे संरक्षक साधने दिली जात नाही.

रविवार (दि. २२/३/२०२० रोजी) येरवडा क्षेत्रिय कार्यालयाकडे अत्यावश्यक सेवेत कचरा वाहतूक विभागात काम करणारा कंत्राटी सेवक प्रतिक केगळे यांना सकाळी कामावर जात असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये पोलिसांनी बेदम मारहाण केली. अंगावर खाकी गणवेश होता, पण त्याच्याजवळ ओळखपत्र नव्हते म्हणून पोलिसांनी काठीने बेदम मारहाण केली. आपत्कालीन परिस्थितीत कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यासंबधी संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने भाग पाडावे अशी, मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.

कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रश्नांच्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी करून देखील संबंधित ठेकेदार व प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप युनियनच्या जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तेही अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगारांना ओळखपत्र नाही, या कारणावरून पोलिसांनी मारहाण करावी ही प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मानवाला ग्रासून मृत्यूने थैमान घातले आहे.

अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धतीने सफाई करणाऱ्या कामगारांच्या जीवावर सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा जीवावर उठत असेल, तर युनियन म्हणून कदापीही अन्याय सहन करणार नाही. पोलीस यंत्रणेला सुध्दा पुणे महानगरपालिका कामगार युनियनने नम्र आवाहन केले आहे की, संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कंत्राटी कामगारांना मारहाण करू नये. तसेच सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यात यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...