‘बकासुराचा’अहवाल सभागृहात आला ..पण …(व्हिडीओ)

Date:

पुणे- भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे असंख्य अहवाल गिळून बसलेल्या महापालिकेने आज आणखी एक मोठ्ठा म्हणजे भ्रष्टाचाराचा बकासुर ठरलेल्या ‘देवदूत ‘ प्रकरणाचा अहवाल सभागृहात मुस्कटदाबी करत गुंडाळून नगरसचिव कार्यालयात पाठविला आहे .महापौर मुक्ता टिळक या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या . त्यांच्या आदेशानेच हा अहवाल सभागृहात वाचून न दाखविता त्यावर चर्चा होवू न देता…ज्यांना पहायचा आहे त्यांनी हा अहवाल नगरसचिव कार्यालयात जावून पाहावा असे सांगत सभागृहातच या अहवालाची  आणि एकूणच  प्रकरणाचा आवाज बंद  करण्याचा प्रयत्न केल्याचे  स्पष्ट झाले आहे .
या अहवालाचा मुद्दा नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज मुख्य सभेत उपस्थित केला , तेव्हा हा अहवाल आताच हाती आला असे सांगून त्यांना दुरूनच फाईल दाखविण्यात आली. पण नेमके या अहवालात काय दडले आहे हे सभागृहात मात्र उलगडू दिले गेलेले नाही .
 गेली काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील नामांकित म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘सकाळ ‘या वृत्तपत्रातून  महापालिकेच्या ‘देवदूत ‘ नावाच्या प्रकल्पात होणाऱ्या गैरबाबी चव्हाट्यावर मांडल्या जात आहेत .या प्रकरणी चौकशी करून अहवाल १५ जुलै रोजी सभागृहात सादर करू असे जाहीर केले होते . आयुक्त खरोखर ‘बकासुराचा वध ‘ करणार कि क्लीन चीट देणार याबाबत उत्सुकता होती . मात्र महापौर यांनी एकूणच हे प्रकरण अशा पद्धतीने सभागृहात चर्चेला येण्यापासून आज थांबविल्याचे स्पष्ट झाले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

पुणे: पुण्यातील मध्यवस्तीचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार...

पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ‘जयस्तंभ’ अभिवादन बंदोबस्तावरील पोलिसांना विशेष प्रशिक्षण!

पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक ‘जयस्तंभ’ अभिवादन सोहळ्यासाठी...

जिल्ह्यातील तीन आयुष आरोग्य संस्थांना राष्ट्रीय एनएबीएच मानांकन

पुणे, दि. 30: जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या राजुर...

आंदोलनानंतरही नाही आली जाग .. पण रिपब्लिकन शहराध्यक्षांचा ९ जागा मिळाल्याचा दावा आंदोलकांनी फेटाळला

पुणे : भाजपा कार्यालयासमोर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करूनही...