पुणे- महानगरपालिकेच्या बांधकामपरवाना विभाग क्र.४ च्या वतीने गुरुव्दारा, लोहगाव, खेसे पार्क
परिसरातील आरसीसी स्वरूपाच्या ७ मिळकतीनी केलेल्या अनधिकृत बांधकामे अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येऊनसुमारे ५००० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
सदरची कारवाई झोन क्र.४ च्या कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणअंतर्गत पूर्ण करण्यात आली. कारवाईत १०पोलिस कर्मचारी, १ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उप निरीक्षक, १५ बिगारी,, २ जेसीबी, २ कॉम्प्रेसोर यांच्या सहय्यानेकारवाई करण्यात आली.
संगमवाडी टीपीएस, कोरेगाव पार्क लेन न ५ येथील रजनीगंधा अपार्टमेंट, श्री. सुनील सिंघल यांनी सामासिक अंतरामध्येकेलेले अनधिकृत पक्क्या स्वरूपाचे सुमारे ८०० चौ. फुट क्षेत्र बांधकाम क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई बांधकाम विकास विभाग झोन क्र ४ कार्यालयाच्या वतीने करण्यात आली. १ जेसीबी, १ गॅसकटर, २ ब्रेअकेर १० पोलीस, २० बिगारी यांच्या साह्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.
पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई…
Date:



