पुणे- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे देण्याबाबतची कार्यवाही पुणे महापालिकेच्या वतीने गतीने कार्यवाही करण्यात येईल असे येथे आज महापौर मुक्ता टिळक यांनी मायमराठी ला सांगितले . या योजनेंतर्गत सव्वालाख घरे ५ वर्षात दिलीजाणार असून , पालिकेच्या ताब्यात सध्या असलेल्या १२ हजार घरांचे वितरण या योजनेंतर्गत त्वरेने करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आज महापौरांनी आयुक्तांना दिले .
आज पुणे महापालिकेत पंतप्रधान आवास योजने बाबत महापौरांनी बैठक बोलाविली होती .खासदार ,आमदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या बैठकीस उपस्थित होते .
या बैठकीनंतर बोलताना महापौर म्हणाल्या , १२ हजार घरे विविध योजनेंतर्गत अगोदरच पालिकेच्या ताब्यात आलेली आहेत , प्रथम त्यांचे वितरण करण्यात येईल. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या विविध भूखंडांवर पुढील घरे बांधण्याबाबत हालचालींना गतीने प्रारंभ करण्यात आला आहे . याबाबत प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत . पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे मिळवीत यासाठी ९६ हजार अर्ज आतापर्यंत पालिकेला प्राप्त झाले असून , अर्ज घेण्याबाबतची मुदत जुलै अखेरपर्यंत वाढवावी असेही सांगण्यात आले आहे .
याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या आमदार निलमताई गोऱ्हे यांनी नेमके काय म्हटले आहे ते ही इथे पहा आणि ऐका…