नवी दिल्ली -पंतप्रधान कार्यालयाकडूनआज पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. , ज्यात १०३ वर्षांच्या वृद्ध महिलेनेआणि लहानग्या मुलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे.
१०३ वर्षांच्या शरबती देवी यांना मोदींना भेटण्याची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत मोदींना पत्रही लिहिले होते. त्यानुसार मोदींनी शरबती देवींना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. शरबती देवी या आपल्या कुटुंबासमवेत मोदींच्या निवासस्थानी पोहोचल्या, त्यांनी यावेळी मोदींना राखी देखील बांधली. ५० वर्षांपूर्वी शरबती देवींच्या भावाचं निधन झालं होतं. रक्षाबंधनच्या सणाला त्यांना नेहमीच आपल्या भावाची आठवण यायची.आज तब्बल पन्नास वर्षांनंतर त्यांनी मोदींना भाऊ मानून रक्षाबंधन संपन्न केले .











