


पुणे- स्मार्ट सिटी केवळ इमारतीचा खेळ नाही तर गरीबीवर मात करणारी संकल्पना असे सांगत प्रत्येक व्यक्तीला घर देता आले पाहिजे असा पुनरुच्चार हि आज येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला‘स्मार्ट सिटी‘ योजनेच्या वर्षपूर्तीच्या बालेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप , खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे ,पालकमंत्री गिरिष बापट, संदीप खर्डेकर , आ. माधुरी मिसाळ,मेघा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
मोदी यावेळी म्हणाले , शहरीकरण हे संकट नाही; संधी आहे. शहरांना ‘ग्रोथ सेंटर‘ म्हणून पाहिले जाते. माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. गरीबीवर मात करण्याचा आणि सामावून घेणे ही प्रक्रिया सर्वाधिक शहरातच होते. शहरात आल्यावर पोट भरण्याचा आणि जगण्याचा काही ना काही मार्ग मिळतोच. आता गरीबीला पचवून ताकद निर्माण करण्यासाठी पाठिंबा देणे हे आपले काम आहे. तुमची ‘स्मार्ट सिटी‘कशी हवी ये दिल्लीत बसून ठरणार नाही .शहराचे व्यक्तिमत्व कायम राखण्यासाठी तेथील नागरिकांकडूनच सूचना मागविण्यात आल्या. शहरांचा आत्मा तोच ठेवून त्याचे रुपडे बदलण्यासाठी ‘स्मार्ट सिटी‘चा उपयोग होईल. हा इमारतींचा खेळ नाही. एलईडी बल्ब वाटण्याचा उपक्रम पूर्ण होईल, तेव्हा 20 हजार मेगावॉट वीज वाचेल आणि एक हजार कोटी रुपयेही वाचतील. हे पैसे देशातील गरीब माणसाचे आहेत. घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करून स्वत:च्या घरासाठी वापरा आणि उर्वरित वीज सरकार विकत घेईल, अशीही योजना आहे. जोपर्यंत आपण तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करू, तोपर्यंत विकासाचे चित्र पूर्ण होणार नाही,‘‘ असेही मोदी म्हणाले.
- स्मार्ट पुणेकरांना माझा नमस्कार –
- महापौरांकडून पंतप्रधानांचा पुणेरी पगडी घालून सन्मान
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्मार्ट सिटी योजनेचे उद्घाटन
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्मार्ट सिटी योजनेचे उद्घाटन
- स्मार्ट सिटी फक्त इमारतींचा खेळ नाही, व्यवस्था गतीशील झाली पाहिजे
- शहरांमध्ये गरिबीला पचविण्याची सर्वात जास्त ताकद
- त्यासाठी शहरांना सामर्थ्य देणे ही गरज
- शहरीकरणाला संकट समजू नका संधी समजा
- प्रत्येक शहराची ओळख, आत्मा वेगळी , त्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा
- केवळ इमारती, रस्त्यांच्या आधारावर शहरांचे मुल्यमापन करता येणार नाही
- एलईडी अभियानामुळे देशभरात २० हजार व्होल्ट वीज वाचणार
- पुणे शहर कशाप्रकारे आकार घेईल याचा विचार दिल्लीत बसून करता येणार नाही
- आवश्यक निकष पूर्ण केल्याच्या आधारावरच स्मार्ट सिटी योजनेतील २० शहरांची निवड
- स्मार्ट सिटी संकल्पना फक्त पैशांशी संबंधित नाही हे जनआंदोलन आहे
- स्मार्ट सिटी उज्ज्वल भविष्याची पायाभरणी
- आपल्यानंतर स्वतंत्र झालेल्या गरीब देशांनी इतक्या कमी वेळात कशी प्रगती केली


