पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार दि. 13 नोव्हेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवार दि. 13 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4 वाजता पुणे विमानतळावर आगमन, दुपारी 4 वाजता पुणे विमानतळावरुन हेलीकॉप्टरने वसंतदादा शुगर इंस्टीटयुटकडे प्रयाण. दुपारी 4.25 वा. वसंतदादा शुगर इंस्टीटयुटच्या हेलिपॅडवर आगमन व वसंतदादा शुगर इंस्टीटयुटकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. “वसंतदादा शुगर इंस्टीटयुट येथील
आंतरराष्ट्रीय शुगरकेन व्हॅल्युचेन व्हीजन 2025 शुगर” कार्यक्रमाचे उदघाटन. सायं 5.50 वा.कार्यक्रम स्थळावरुन पुणे विमानतळाकडे प्रयाण. सायं 6.15 वा. पुणे विमानतळावर आगमन व सायं 6.20 वा. दिल्लीकडे प्रयाण.

