पुणे- भारतातल्या सार्वजनिक जीवनात वरिष्ठ नेते म्हणून ज्यांचे नाव घेता येईल असे शरद पवार…आमदार ते खासदार असा त्यांचा दीर्घ प्रवास झाला आहे . जे स्वतः एक विरासत आहेत ,ज्याचा मी अत्यंत आदर करतो .सार्वजनिक जीवनात सर्वांसाठी उत्तम आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते . प्रसंगी त्यांनी बोट धरून देखील मला चालत जाण्यास वेळोवेळी मदत केली आणि हे जाहीरपणे सांगण्यास मला अभिमान वाटतो अशा शब्दात आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याने पुन्हा एकदा पवार यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत . आणि राष्ट्रपती पदाबाबत देखील पुन्हा चर्चा सुरु झाली आहे .वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित “शुगरकेन व्हॅल्यू चेन–व्हिजन 2025 शुगर” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या वेळी मोदी यांनी आपल्या भाषणात पवार यांचे कौतुक केले.