रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता लाईट बंद करून दिवे उजळा- पीएम मोदी (व्हिडीओ)

Date:

“देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केलं ते उल्लेखनीय आहे. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे. या लोकांनी संकट काळात सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलं आहे. देश एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी देशातील जनतेकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटं देण्याचं आवाहनही केलं.

“देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं कसं लढू. अजून असे लॉकडाउनचे किती दिवस असतील. आज लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नाही. १३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला करोना संकटाला हरवायचं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“१३० कोटी लोकांच्या महासंकल्पाला आपल्याला आता पुढे घेऊन जायचं आहे. मला ५ एप्रिल रात्री तुमच्या सर्वांची नऊ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू करा. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद केल्यानंतर जेव्हा हा प्रकाश उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होईल. त्यावेळी प्रत्येकानं आपल्या मनात संकल्प करा की आपण एकटे नाही आहोत,” असंही मोदी यावेळी म्हणाले. “परंतु यावेळी कोणीही एकत्र जमू नये. तसंच सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषाही आपल्याला तोडायची नाही. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...