पुणे- जगण्यासारख्या अजूनही काही गोष्टी आयुष्यात घडत आहेत … असे मोठे अर्थपूर्ण उद्गार नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी … ४४ वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित होत असलेल्या ‘पिंजरा या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत काढले . सुरुवातीला आपला पिंजरा या नावालाच विरोध होता .. आणि हा चित्रपट आपल्याला कसा मिळाला … कसा घडला याच्या असंख्य आठवणी या वेळी डॉ. लागू यांनी पत्रकारांना सांगितल्या ….
जुना आहे तसा हा सिनेमा नव्या अत्याधुनिक तंत्राने सजवून १८ मार्च रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे . ४४ वर्षांपूर्वी ज्या मुलांनी हा सिनेमा पाहिला तीच मुले आता आपल्या मुलाबाळांना घेवून कुटुंबासह हा सिनेमा नक्की पाहतील असा विश्वास यावेळी प्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला . किरण शांताराम यावेळी उपस्थित होते .