Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘हिडन’ मध्ये दडलंय काय? याचं रहस्य १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटीवर!

Date:

‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’च्या ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘हिडन’  या  नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. येत्या १६ जुलै रोजी ‘हिडन’ही मेगा वेबसिरीज ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रतिक्षा, कुतूहल, उत्सुकता शमवित आज ‘हिडन’ मधील कलाकार, तंत्रज्ञांच्या यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आलिशान ‘द क्लब’ येथे ‘हिडन’ची उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या या ट्रेलरचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. ‘गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन’  करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचे कुतूहल तयार झाले असून १६ जुलैला अनेक ‘हिडन’ असलेल्या रहस्यांची ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर उकल होणार आहे.

‘हिडन’ ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे, ‘हिडन’ ही  काल्पनिक कथा आहे. या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच यातील रहस्य नेमकं काय आहे त्याचा प्रेक्षकांना उलगडा होणार आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहे. हिडन मधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. पोलिस, गुन्हे, ड्रग्ज, खून, रहस्य यांचे वेगवान चित्र हिडन मध्ये पहायला मिळणार आहे. येत्या १६ जुलै रोजी ही भव्य वेबसिरीज पिंग पॉंग एंटरटेन्मेन्ट या नव्या ओटीटी चॅनेलवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे.

एका रात्री प्रदीप राजे (एसीपी क्राइम ब्रँच) यांना त्यांचा विश्वासू खबरी (हलका)  मध्यरात्री अडीचच्या सुमारास तुरूंगात एकाचा खून होणार आहे, अशी माहिती देतो. एसीपी राजे ही गोष्ट गांभीर्याने घेतात. आयुक्त यशवंत नाईक यांना याबाबत पूर्व कल्पना देतात. समय दीक्षित या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अज्ञात मारेकऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला वाचविण्यासाठी राजे आपल्या तीन विश्वासू अधिकाऱ्यांसोबत (संदीप, प्रभाकर आणि उमर) योजना आखतात. पोलिस आयुक्त (यशवंत नाईक), यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने पोलिस अधिकारी राजे वैयक्तिकरित्या या बाबीकडे लक्ष देतात. धक्कादायक बाब म्हणजे समय तुरूंगात आहे आणि “मारेकरी” म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. त्याचा जिवलग मित्र मनन शाह याच्या हत्येचा त्याच्यावर आरोप येतो. समय खरोखर गुन्हेगार आहे कि निर्दोष ? त्याला राजे वाचवू शकणार का? त्याच्या भूतकाळात असे काय घडले ज्यामुळे त्याच्यावर असे आरोप आले आहेत ?नेमकं वास्तव काय आहे? अनेक ‘हिडन’ गोष्टींची उकल होण्यासाठी हिडन पहावीच लागेल..

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे ‘पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. ‘हिडन’ वेबसिरीज बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबनराव जाधव म्हणाले, “भाषेला, भावनांना आणि विषयांना मर्यादा नसतात आणि म्हणूनच ‘पिंगपॉंग एंटरटेनमेंट’ ओटीटी ऍप चालू करायचं ते जास्तीत जास्त भाषांमधून जास्तीत जास्त कन्टेन्ट घेऊन लोकांपर्यंत पोहोचावं ह्या हेतूने… लोकांना आवडणारा कन्टेन्ट हा भाषेमुळे मर्यादित नसावा, ज्या प्रेक्षकाला ज्या पद्धतीचा कन्टेन्ट हवा तो आम्ही उपलब्ध करून दिला आहे आणि ह्या पुढील काळातही देऊ. उत्तम संहिता, कलाकार, तंत्रज्ञ घेऊन सतत नवनवीन कन्टेन्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्याला फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातून प्रेक्षक पसंती मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ अँपवर प्रस्तुत होणाऱ्या HIDDEN ह्या बिग बजेट वेबसिरीसचे ७ भाग १६ जुलै पासून  प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे आम्ही ह्या ७ एपिसोडच शूट हे अवघ्या १५ दिवसात वैविध्य ठिकाणी जाऊन केलं आहे आणि ते पण करोना काळात… ज्या वेळी शूटिंगचे नियम शिथिल केले होते त्यावेळी. ह्या वेबसिरीससाठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ  ह्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हि कलाकृती केली आहे आणि ती प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी मला खात्री आहे”

‘पिंग पॉंग’चे चॅनेल हेड चेत्न डीके म्हणाले “आजच्या जीवनात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे रोटी, कपडा, मकान और मोबाईल… आज जगात बहुतांश लोकांकडे स्मार्ट फोन आहेत आणि त्यातूनच आपण लोकांना उत्तमोत्तम कन्टेन्ट देऊ शकतो ह्या भावनेने आम्ही ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ची सुरुवात केली. ज्यावेळी HIDDEN हा कन्सेप्ट माझ्या समोर आला त्यावेळी आम्ही त्याला ताबडतोब फायनल केला कारण त्याचा उत्तम कथा, पटकथा आणि संवाद… मागील १५ वर्षांचा अनुभव पणाला लावून मी हि संहिता करण्याचे ठरवले कारण हि संहिता सर्वच वयोगटातल्या लोकांना आवडेल, खिळवून ठेवेल अशी आहे. जशी आम्ही संहिता ऐकली होती तशीच हुबेहूब चित्रित झाली असून त्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ ह्या सर्वांचे मनापासून अभिनंदन!!! येत्या काळात नवनवीन संहिता घेऊन त्याचे प्रयोजन करून, त्याचे प्रभावी मार्केटिंग करून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि प्रेक्षकांना ते पसंतीस उतरावे असा आमचा मानस आहे.”

‘हिडन’ मध्ये नेमकं काय ‘हिडन’ आहे याविषयी लेखक दिग्दर्शक विशाल सावंत म्हणाले, “हिडन बाबत सर्वच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. येत्या १६ जुलैला ही उत्सुकता अधिकच गहिरी होईल आणि नेमकं हिडनमध्ये काय हिडन आहे याविषयी चर्चा सुरु होईल. त्यांच्या साऱ्या प्रश्नांची उकल होण्यासाठी प्रेक्षकांनी या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहणं गरजेचं आहे. मुंबई शहरातील डार्कशेड हिडन मध्ये दिसेल.  गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील.”

‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.”साठी विशाल पी. सलेचा आणि महेश पटेल यांनी ‘हिडन’ची निर्मिती केली असून विशाल सावंत यांनी या वेबसिरीजचे लेखन दिग्दर्शन केले आहे. कमल सिंग यांचे छायांकन असून रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘हिडन’ मध्ये संतोष जुवेकर, संजय सोनू, दक्ष अजित सिंग, जीत सिंग, मनवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ओरिजनल मनोरंजनाचा अमर्याद आनंद मिळविण्यासाठी आपल्याला ‘गुगलप्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपस्टोअरवर’ जाऊन ‘पिंग पोंग’ हे ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा https://pingpongentertainment.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...